पिंपरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल शनिवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा 61.64 टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक सफलता क्रीडा प्रबोधनी विद्यालयास मिळाली असून या शाळेचा निकाल 86.95 टक्के लागला आहे. तर सर्वांत कमी निकाल नेहरुनगर विद्यालयाचा लागला आहे. नेहरुनगर विद्यालयातील केवळ 39.13 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होऊ शकले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव मनपा शाळेतील राज उदय गिरी या विद्यार्थ्यांने 93.40 टक्के गुण मिळवत प्रथम आलेला आहे. शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 शाळा आहेत. यामधील, उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधनी या शाळेचा शहरातील मनपा शाळांमध्ये सर्वाधिक 86.95 टक्के निकाल लागला आहे.
शहरातील महापालिकांच्या शाळांमधील दहावीच्या परीक्षेचा निकाल भोसरी माध्यमिक विद्यालयाचा 69.83 टक्के, कासारवाडी मनपा विद्यालय 67.44, नेहरुनगर विद्यालय 39.13, केशवनगर विद्यालय 83.33, काळभोरनगर विद्यालय 45, फुगेवाडी मनपा विद्यालय 54, आकुर्डी उर्दू विद्यालय 79.64, संत तुकाराम विद्यालय 58.64, निगडी विद्यालय 64.64, पिंपळे सौदागर मनपा विद्यालय 64.40, पिंपरी विद्यालय 48.38, खराळवाडी मनपा विद्यालय 52, पिंपळे गुरव विद्यालय 72.72, लांडेवाडी विद्यालय 54.16, रुपीनगर मनपा विद्यालय 54.30, क्रीडा प्रबोधनी विद्यालय 86.95, वाकड मनपा विद्यालय 53.63, थेरगाव विद्यालयाचा 74.56 टक्के निकाल लागला आहे.