लिपिक, शिपाई, चालक संवर्ग : पात्र अधिकाऱ्यांना मिळाली बढती
पिंपरी – महापालिकेच्या विविध संवर्गातील दुसऱ्या टप्प्यातील बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बदलीस पात्र ठरलेल्या एकूण16 कर्मचाऱ्यांची अन्य विभागांत पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये लिपिक, कॉम्युटर ऑपरेटर, वाहनचालक व शिपाई या संवर्गातील पदांचा समावेश आहे.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात वाद निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार एकाच विभागात सेवेचा सहा वर्ष पूर्ण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच बढतीस पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिका प्रशासनाने रखडलेल्या बदल्या व पदोन्नतीचा प्रश्न हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या विविध विभागांमधील 91 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लेखाधिकारी, लेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक, सर्व्हेअर, अनुरेख, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचा समावेश होता. याशिवाय आचारसंहितेची मर्यादा असल्याने 38 जणांच्या रखडलेल्या बढत्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये भांडारपाल, कार्यालयीन अधीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि मुकादमपदी बढती देण्यात आली आहे.