पीसीईटी-“नूतन’च्या 207 विद्यार्थ्यांना “कॅप जेमिनी’मध्ये नोकरी

तळेगाव दाभाडे – पीसीईटी-नूतन ग्रुपच्या “पीसीसीओई’ (निगडी), पीसीसीओईआर (रावेत), नूतन महाराष्ट्र (तळेगाव) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या या वर्षीच्या “कॅम्पस प्लेसमेंट’ मुलाखती नुकत्याच झाल्या. त्यातील पहिल्याच दाखल झालेल्या “कॅप जेमिनी’ या कंपनीने एकाच दिवशी 207 विद्यार्थ्यांना 6.8 लाख आणि 3.8 लाख वार्षिक पगाराचे पॅकेज दिले आहे. यावेळी कंपनीतील मनुष्यबळ विभागाचे निरज कापरे उपस्थित होते, अशी माहिती पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.

रोजगार निर्मितीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पीसीईटी-नूतन ग्रुपतर्फे आजपर्यंत सुमारे 21 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी सुमारे 400 नामांकित कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट देऊन मेकॅनिकल, सिव्हिल, ई ऍण्ड टीसी, कॉम्प्युटर, आयटी आदी शाखांमधील 775 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली आहे. यामध्ये ऍमेझॉन कंपनीने 28 लाख, क्रेडिटसूसने 10 लाख, क्वांटिफायने 9.5 लाख अशा पगाराच्या नोकरींची संधी “कॅम्पस प्लेसमेंट’मधून दिली आहे. त्या सोबतच केपीआयटी, एल. ऍण्ड टी, अल्फा लावल, गोदरेज, थरमॅक्‍स, फोक्‍स वॅगन, ऍटलास कॉप्को, केएसबी आदी शेकडो कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी दरवर्षीप्रमाणे दाखल झाल्या होत्या. सर्व क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या कंपन्यांमध्ये तीन लाखांपासून 32 लाखांपर्यंतच्या वार्षिक पगाराच्या नोकऱ्या दिल्या जात असल्याचे प्रा. रवंदळे यांनी सांगितले.

कॅप जेमिनी कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. हरीश तिवारी, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या मुलाखतीचे आयोजन प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. श्रीधर शरणप्पा, महेश काटे व सेंट्रल प्लेसमेंटच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)