“पीसीसीओईआर’मध्ये भरला “उद्‌बोधन वर्ग’

संशोधन व उद्योजकता महत्त्वाची क्षेत्र !

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. विजय नवले म्हणाले, दुसऱ्या वर्षापासूनच नोकरी, व्यवसाय, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन आदी संधींची माहिती घ्यायला सुरुवात करा. त्यातील माझ्या आवडीचे, माझ्या क्षमतांना अनुकूल असे कोणते क्षेत्र आहे, त्याची निवड करा. त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठीची तयारी अंतिम वर्षामध्ये जाईपर्यंत पूर्ण करावी. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक वातावरणामध्ये आपण आपल्याला हव्या त्या अभियांत्रिकीच्या उपक्षेत्रात प्रवेश करू. अभियांत्रिकीनंतर संशोधन आणि उद्योजकता ही आगामी काळातील उपयुक्त क्षेत्रे असतील’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्चमध्ये द्वितीय वर्षात प्रवेश केलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा उद्‌बोधन वर्ग संपन्न झाला. प्रथम वर्ष अभियांत्रिकी यशस्वीरित्या पार करून द्वितीय वर्षात विविध विभागात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि पुढील मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले, डॉ. शाम मानकर, डॉ. समीर सावरकर, डॉ. अर्चना चौगुले, डॉ. राहुल मापारी, प्रा. सोनाली कणसे आदी उपस्थित होते.

आगामी दोन वर्षांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उत्तम ठेवल्यास आणि स्वतःला स्पर्धात्मक बनविल्यास प्लेसमेंटच्या संधींचा लाभ घेता येईल. संभाषणाची इंग्रजी भाषा, ग्रुप डिस्कशन, मुलाखतीची तयारी यांची सातत्याने तयारी केल्यास अभियांत्रिकी नंतर नोकरीची अडचण राहणार नाही. परदेशी भाषा शिकणे हे देखील उपयुक्त ठरेल, असे मार्गदर्शन प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी केले. प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी संशोधन क्षेत्रातील संधीची माहिती दिली. उत्तम अभ्यास, प्रात्यक्षिके, निरीक्षण शक्ती याद्वारे अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतः पेटंट, कॉपी राइट, संशोधन या क्षेत्रात चमकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. संशोधन क्षेत्रातील करिअरमधील आव्हाने आणि त्यासाठीची तयारी याविषयावर त्यांनी पालकांना देखील मार्गदर्शन केले. डॉ. समीर सावरकर यांनी विद्यार्थी – पालक समन्वयाचे महत्त्व सांगितले. प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. संदीप बोरगावकर यांनी आभार व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)