पुणे : चिराग शेट्टी, रितुपर्णा दास आणि लोह किनने पुणे एसेज संघाला प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये मुंबई राॅकेट्सवर ५-२ ने विजय मिळवून दिला. चिराग शेट्टी आणि हेंड्रा सेतियावान या जोडीने ‘किम जी जंग’ आणि ‘किम सा’ जोडीचा १४-१५, १५-१४, १५-६ असा पराभव केला.
.@7acespune took the Maharashtra derby by storm, starting their #PBLSeason5 campaign with a bang! 💪🏻⚡#RiseOfTheRacquet #PUNvMUM pic.twitter.com/EhMCNAQWuF
— Premier Badminton League (@PBLIndiaLive) January 25, 2020
महिला एकेरीत पुणे संघाच्या रितुपर्णा दासने ट्रंप सामन्यात श्रेयांशी परदेशीचा ११-१५, १५-९, १५-९ असा पराभव केला. पुरूष एकेरी सामन्यात जागतिक क्रमवारीत ३६ व्या स्थानी असलेल्या लोह किन याने पारूपल्ली कश्यप चा १५-७, १५-१४ असा पराभव करत विजय नोंदविला.
AND THAT IS IT! 🤩
Chris and Gabby Adcock win the match in three games to provide @7acespune a 5-2 victory over @Mumbai_Rockets_! 🙌🏽 #RiseOfTheRacquet #PBLSeason5 #PUNvMUM
— Premier Badminton League (@PBLIndiaLive) January 25, 2020
त्यानंतर मुंबईच्या ली डोंगने पुणे संघाच्या कासुमासा सकईचा १५-७, १५-१३ असा पराभव केला. अंतिम सामन्यात पुणे संघाच्या क्रिस आणि गैबी या जोडीने मुंबई संघाच्या किम जी जंग आणि औ पिया जेबिहा या जोडीचा १५-१२, १०-१५, १५-६ असा पराभव करत विजय नोंदविला.