मुंबई – आयपीएल 2022 मध्ये 16 वा सामना खेळला जात आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा संघ आमनेसामने आहे. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढत आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
🚨 Toss Update 🚨@hardikpandya7 has won the toss & @gujarat_titans have elected to bowl against @PunjabKingsIPL.
Follow the match ▶️ https://t.co/GJN6Rf8GKJ#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/pKhxg8fHWv
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2022
गुजरात टायटन्स आज दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. संघाने दर्शन नळकांडे आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश केला आहे. दोन्हीही खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करत आहेत. विजय शंकरच्या जागी साई सुदर्शन आणि वरुण अॅरानच्या जागी दर्शन नळकांडेला संघात स्थान देण्यात आले आहे.
दुसरीकडे पंजाब किंग्जने इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टोला पदार्पणाची कॅप दिली आहे. तो आज मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. भानुका राजपक्षे यांच्या जागी त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, पंजाब किंग्ज गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे गुजरात टायटन्सने आतापर्यंत २ सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्ज संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), ओडियन स्मिथ, शाहरुख खान, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, कागिसो रबाडा, राहुल चहर
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लोकी फर्ग्युसन, रशीद खान, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे