पेटीएम केवायसी अपडेट करताय, तर सावधान

जानेवारीपासून 152 तक्रारी : आतापर्यंत 17 लाखांची फसवणूक

पुणे – पेटीएमला केवायसी अपडेट करायचा मेसेज नागरिकांना येऊन त्यांच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. शहरात जानेवारीपासून 152 तक्रारी दाखल झाल्या असून, त्यामध्ये सुमारे 15 ते 17 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तर, मागील दोन-तीन दिवसांत दररोज 10 ते 12 तक्रारी आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आपल्या मोबाइलवर “Dear Paytm customer your Paytm KYC has been suspended. Call Paytm office PH. 6295****61 immediately. Your account will block within 24 hr. Thank you Paytm team. अशा प्रकारचा बल्क मेसेज सायबर क्रिमिनल्स कडून येत आहे.

मेसेजमधील नमूद क्रमांकावर कॉल केल्यास पेटीएम कंपनीतून बोलत आहे, असे सांगून आपला विश्वास संपादन करून पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने हे क्रिमिनल्स आपल्या डेबिट कार्डची माहिती व ओटीपी घेऊन आपले बॅंक खाते संपूर्ण साफ करत आहेत. पेटीएम वापरणारा वर्ग शिक्षीत असूनही असे प्रकार वाढत आहेत. नागरिक सहज आपल्या क्रेडिट, डेबिट आणि बॅंक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना फोन वरुन देत आहेत. समोरील व्यक्तींनी पाठवलेली कोणतीही लिंक ओपन केल्यास बॅंकखात्यातील पैसे समोरील व्यक्तीच्या खात्यात वर्ग होतात.

पेटीएम कंपनी अशा प्रकारचे कोणतेही मेसेज पाठवत नाही, तसेच फोन करत नाही. यामुळे सावध होऊन कोणत्याही प्रकारच्या मेसेज किंवा फोन कॉलला बळी पडू नका. पूर्वी बॅंकेतून बोलतोय असे सांगून खात्याची गोपनीय माहिती घेऊन फसवणूक केली जायची. तसाच हा प्रकार आहे.
– जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.