व्हॉटस्‌ऍपकडून लवकरच पेमेंट सेवा

नवी दिल्ली – व्हॉटस्‌ऍपचे मॅसेजिंग ऍप भारतात लवकरच आपली पेमेंट डेटासह अन्य सुविधा लवकरच सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ही सेवा योग्य पद्धतीने कार्यरत होण्यासाठी आणखीन पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सेवेचे प्रात्यक्षिक चाचणी घेताना अन्य कंपन्यांसोबत विचारविनिमय करावा लागत आहे.

व्हॉटस्‌ऍपला मर्यादित कार्यक्षेत्रात म्हणजे 10 लाख युजर्समध्ये ही सेवा सादर करण्याची मान्यता दिली आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस चालवणारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही सेवा कार्यरत करताना सध्या तरी लहान आकारातील रकमेचे व्यवहार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. व्हॉटस्‌ऍपच्या प्लॅटफॉर्मवर सध्या किती युजर्स नोंदणीकृत आहेत यांची माहिती दिली नाही.

ही पेमेंट सेवा सुरू करण्यात आल्यावर पेमेंट संदर्भात करण्यात येणाऱ्य़ा व्यवहाराची माहिती देशांतर्गतच साठवण्यासाठी व्हॉटस्‌ऍप सध्या काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.