मुंबई – लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अनुराग कश्यपची काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यप वर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत या दिग्दर्शकावर Metoo चा आरोप केला होता.
या प्रकरणावरून तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून अनुराग कश्यपची कसून चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र, चौकशीदरम्यान अनुरागने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले.
दरम्यान, आता पुन्हा एकदा पायलने सोशल मीडियावर एक ट्विट केले असून, सध्या तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे.
These mafia gang will kill me sir @PMOIndia @narendramodi sir @sharmarekha ma’am and will prove my death as suicide or something else 🙏🏼
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 10, 2020
पायल घोषने असे म्हटले आहे की, “सर ही माफिया गँग मला मारून टाकेल आणि माझ्या मरणाला ते आत्महत्या किंवा आणखी काहीतरी केल्याचे सिद्ध करतील.’ असं तिने म्हंटलं आहे.
पायल घोष या ट्वीटमधून कुणाचेही नाव न घेता टीका करत आहे. अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपानंतर तिचे आयुष्य धोक्यात असल्याचे तिचे म्हणणे आहे. पायल घोष आणि ऋचा चड्ढाचा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता.