अभिनेत्री पायल घोष सध्या बॉलीवूडमधील आपल्या एका रोलसाठी स्पॅनिश शिकते आहे. स्पॅनिश बोलण्याचा रितसर सराव करण्यासाठी तिच्यासाठी एका स्पॅनिश शिक्षकाचीही व्यवस्था केली गेली आहे. या टीचरकडून पायल स्पॅनिश उच्चार आणि बोलण्याची पद्धत शिकून घेते आहे.
स्पॅनिशमध्ये प्रत्येक भावना, हाव भाव वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित केले जातात. ही अगदी खुली भाषा आहे. त्यामुळे आपण स्पॅनिश खूप चांगल्या प्रकारे बोलू शकू, असा आत्मविश्वास तिला वाटतो आहे. पायल घोष 2017 मध्ये पटेल की पंजाबी शादीमध्ये दिसली होती. मात्र त्यानंतर ती एकदम गायब झाली होती.
स्पॅनिश शिकण्यसाठी तिच्याकडे कोणत्या सिनेमातला रोल आला आहे, हे मात्र तिने सांगितले नाही. या सिनेमाची अजून औपचारिक घोषणा व्हायची आहे. त्यामुळे ही घोषणा होईपर्यंत पायल घोष आपला स्पॅनिश शिकण्याचा क्लास सुरूच ठेवणार आहे. दरम्यान तिला या रोलसाठी मध्यपूर्वेतील आहार घ्यावा लागतो आहे. बंगाली असल्यामुळे ती पहिल्यापासून मिठाईवर ताव मारत आली आहे. पण ही मिठाई तिला सध्या खाणे थांबवावे लागले आहे. एवढे सांगूनही तिने सिनेमाचे नाव सांगितले नाहीच.