नगर -स्वाभिमानी सुरक्षा रक्षक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा रूग्णालय येथील काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा मागील सात महिन्याचे वेतन द्यावे असे निवेदन खा. डॉ. सुजय विखे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी सुरक्षा रक्षक कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर मुरकुटे, सरचिटणीस अजीनाथ कंठाळे, देवेंद्र भाबड, सुरक्षा रक्षक सूरज दहिंडे, पवन डहाने, अमोल होळकर, गणेश सासवडे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या कामगार विभागाअखत्यारीत असणाऱ्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जिल्हा रूग्णालयात 17 सुरक्षा रक्षक सुरक्षेचे काम करत आहे. वेळावेळी पाठपुरावा करून देखील जिल्हा रूग्णालय प्रशासनाने सदरील सुरक्षा रक्षकांचा मागीत सात महिन्याचा थकीत पगाराबाबत अद्यापही कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांची उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने सुरक्षा रक्षकांचा मागील सात महिन्याचा पगार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.