मोदींच्या भेटीबद्दल पवारांनी सांगितलेले ‘ते’ अर्धसत्य – फडणवीस 

मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष पाहिला मिळला. यानंतर अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. सत्तास्थापनेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महत्वाची भूमिका होती. दरम्यान, राष्ट्रवादीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑफर दिली असल्याचे पवार यांनी सांगितले होते. यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी सांगितलेले अर्धसत्य असल्याचे म्हंटले आहे.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काय चर्चा झाली? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मोदी आणि शरद पवार यांच्यातील चर्चेला केवळ त्या दोनच व्यक्ती उपस्थित होत्या. या भेटीबद्दल शरद पवार यांनी त्यांची बाजू मांडली आहे. मात्र, त्यांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे, या भेटीचा पूर्ण तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीत नेमकं काय झालं? याबद्दल मला काही प्रमाणात माहिती आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी बाजू हे ते स्वत:च सांगतील किंवा ते ज्या व्यक्तीला अधिकार देतील, तीच व्यक्ती याबाबत बोलेन. मी या भेटीचा तपशील सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाविकासआघडीचे सरकार हे ऑटोरिक्षा सरकार आहे. हे सरकार कितपत टिकेल सांगता येत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. तसेच शिवसेनेने कधीही हाक दिलीतर आम्ही साद द्यायला तयार आहोत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.