पवार, थोरात, कालडा, वखारे अडकले शिवबंधनात

संगमनेर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहत आहे. त्याचे लोण संगमनेरात देखील पोहोचले आहे. माजी नगरसेवक जयवंत पवार, स्वाभिमानी मंडळाचे प्रमुख शरद थोरात, गिरीष कालडा, पप्पू वखारे आदी कॉंग्रेसमधून स्वगृही परतत शिवबंधनात अडकले. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले.

जयवंत पवार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. मात्र काही वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळ ते नगरसेवकदेखील होते. याशिवाय त्यांचे बंधू किशोर पवार आणि त्यांच्या भावजय योगिता पवार देखील कॉंग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. जयवंत पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी किशोर पवार आणि त्यांच्या पत्नीने कॉंग्रेसमध्ये थांबण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली.

शरद थोरात यांनी देखील अपक्ष उभे राहात नगराध्यक्षपदासाठी आपले नशीब अजमावले. मात्र त्यांना अपयश आले होते. त्यांच्यासोबत आमदार बाळासाहेब थोरात यांचे चुलतभाऊ असलेले आणि स्वाभिमानी मंडळाचे प्रमुख शरद थोरात, माजी नगरसेवक किशोर कालडा यांचे बंधू गिरीष कालडा यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. शरद थोरात यांनीदेखील अपक्ष उभे राहात नगराध्यक्षपदासाठी आपले नशीब अजमावले. मात्र त्यांना अपयश आले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, माजी उपजिल्हाप्रमुख ऍड. दिलीप साळगट आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.