पवारकन्येचीही राजकाणात एंट्री

राजगुरुनगर – स्व. नारायणराव पवार यांची मुलगी प्रिया पवार यांनी नुकतीच राजकारणात एंट्री मारली आहे. प्रिया पवार यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. प्रवेश होताच कॉंग्रेस पक्षाच्या वतीने प्रिया यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर संधी देण्यात आल्याने पवार घराण्याचा वारस जनतेसमोर आला आहे. राजकारणातील प्रिया यांची एंट्री पवार घराण्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठीच झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अजूनही खेड तालुक्‍यात स्व. नारायणराव पवार यांचा गट सक्षमपणे कार्यरत आहे. अनेक निवडणुकांमध्ये हा गट सक्रिय काम करीत असल्याने प्रिया यांच्या राजकीय प्रवेशाने कॉंग्रेसला ताकद मिळाली आहे.

रविवारी (दि. 28) स्व. नारायणराव पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्टवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे तालुक्‍यात सर्वत्र महत्त्वाच्या जागांवर आणि गावागावात होर्डिंग झळकत आहेत. तालुक्‍यात पवार घराण्यातील तीन युवा नेतृत्व पुढे आल्याने पुन्हा परिवर्तन अटळ असल्याची सध्या मोठी कुजबुज सुरु आहे. या होर्डिंगवर ऋषिकेश, प्रिया आणि अमोल पवार यांचे फोटो असल्याने खेडच्या राजकारणात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)