पवार, बेनके यांचा वाढदिवस साजरा

ओतूर – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुन्नर तालुक्‍यातील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

सकाळी एसटी स्टॅंडवर सात जेसीबी, सात ट्रॅक्‍टर, चार डंपर तसेच अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएसचे 250 व चैतन्य विद्यालयाचे 60 विद्यार्थी, ओतूर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. ओतूरचे माजी सरपंच गोविंद तांबे यांच्या हस्ते नारळ फोडून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच संतोष तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके या तिघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रत्येकाने अशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करावा व राजकारण विरहीत सामाजिक काम करावे, असे मत व्यक्त केले. अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य साळवे यांनी आपल्या मनोगतात या अभियानाचे आयोजक पंचायत समिती सदस्य विशाल तांबे यांचे विशेष कौतुक केले. वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना अतुल बेनके म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बाबितमळा के. टी. बंधारा व सात कोटी रुपयांचे ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, उपसरपंच सुरेखा तांबे, जयप्रकाश डुंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, जालिंदर पानसरे, देविदास तांबे, वैभव तांबे, गोविंद तांबे, गुलाब डुंबरे, राजेंद्र डुंबरे, प्रेमानंद अस्वार, राजेंद्र वाळुंज, प्रशांत डुंबरे, योगेश डुंबरे, निलेश तांबे व ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दिवसभर स्वच्छता, वृक्षारोपण, छोटे खड्डे बुजवणे हे उपक्रम प्रत्यक्षपणे सुरु असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा आज वाढदिवस असून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार यांचाही वाढदिवस आहे. ओतूरकरांनी ग्रामस्वच्छता अभियान, रस्त्यावरील छोटे-मोठे खड्डे बुजवणे, वृक्षारोपण अशा सामाजिक उपक्रमातून माझा व अजितदादांचा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद होत असून ओतूरकरांसाठी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले व पंचायत समिती सदस्य विशाल तांबे सक्रिय व भरघोस काम करत असल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.ा
-अतुल बेनके, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)