पवार-अमित शहा भेट ! सत्तास्थापनेसाठीच्या आता आदेशाची प्रतीक्षा; भाजप नेत्याचं विधान

मुंबई – सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांचे गृहमंत्र्यांवरील आरोप आणि उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीमुळं सत्तांतरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात आता भाजप नेत्यानं राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात सूचक विधान केलं आहे.

शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होणार का ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, केंद्रातून कसा आदेश येतो ते आता बघायचं. वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची, असं सूचक उत्तर राणेंनी दिलं.

शरद पवार-अमित शाह भेटीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार अशा चर्चांना विधान आलं आहे. तर राष्ट्रवादीकडून पवार-शहा भेट झाली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. तर खुद्द अमित शाह यांनी सर्व गोष्टी उघड करत नसल्याचे सांगत सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे राज्यात पुढं काय होणार याचं कोडं सर्वांना पडलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.