Pawan Kalyan । Sanatan Dharma : राजमहेंद्रवरम जनसेना पक्ष प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी “नरसिंह वाराही विंग” विशेष दलाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. धर्म आणि संस्कृतीचे संरक्षण मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पवन कल्याण यांनी या पाऊलामुळे धर्मनिरपेक्षता आणि संविधानाचा आदर कमी होणार नाही यावर भर दिला. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे, परंतु कोणत्याही प्रकारचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, “असे त्यांचे मत आहे.
“I respect all religions, but I stand firm on my faith. Those who criticize Sanatana Dharma on social media or speak disrespectfully about it will have to face the consequences. Thus, I am establishing a dedicated wing within our party named the ‘Narasimha Varahi Brigade’ for the… pic.twitter.com/Z8kMilWbBF
— ANI (@ANI) November 2, 2024
सनातन धर्माची खिल्ली उडवणारी पोस्ट खपवून घेतली जाणार नाही :
पवन कल्याण यांनी म्हटलं आहे की, हिंदू मंदिरांना भेटी देताना आणि सनातन धर्माचे पालन करताना काही मूल्ये जपली पाहिजेत. सनातन धर्माशिवाय देश तसाच राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सनातन हा केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे.
‘सोशल मीडियावर हिंदू धर्म किंवा सनातन धर्माची खिल्ली उडवणारी कोणतीही पोस्ट खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत सनातन धर्माची बदनामी रोखण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून जनसेना पक्षाने सनातन धर्म संरक्षणासाठी नरसिंह वाराही विंगची स्थापना केली आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.
भाजपकडून देखील समर्थन :
पवन कल्याण यांच्या घोषणेवर भाजप नेते नलिन कोहली यांनी म्हटलं आहे की, काही लोकांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. सनातन धर्माविषयी मूर्खपणाच्या गोष्टी बोलल्या आहेत. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री सनातन धर्माबद्दल काय म्हणाले.
त्यांनी सनातन धर्माची तुलना एका रोगाशी केली. हे कुठल्या धर्माबद्दल म्हणायला हवं का? फक्त सनातनलाच का टार्गेट? कोणाला सनातन धर्म बळकट करायचा असेल तर त्यात गैर काय?, असा सवालही नलिन कोहलींनी केला आहे.