पवना शिक्षण संकुलची कुस्तीत बाजी

शालेय क्रीडा स्पर्धा : विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

पवनानगर – मावळ तालुका शालेय क्रीडा विभाग आयोजित कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी दीपक विलास कालेकर याने प्रथम, तर संदेश विलास मोरे याने द्वितीय क्रमांक मिळवला. दीपक कालेकर याच्या यशाबद्दल संकुलाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षिका नीला केसकर, शिक्षक प्रतिनिधी रोशनी मरांडे, ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग ठाकर, प्रा. वैशाली पाटील, प्रा. मोहन शिंदे यांच्या हस्ते कबड्डीतील यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये राजकुमार वरघडे, संजय हुलावळे, संदीप शिवणेकर, गणेश ठोंबरे, गणेश साठे, पल्लवी दुश्‍मण यांचा समावेश आहे. या कुस्ती स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे यांनी विशेष अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here