गर्दीत अडकली दिशा पाटणी 

दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफ हे सेलिब्रिटी कपल अधूनमधून एकत्र हिंडताना दिसत असते. बॉलिवूडमध्ये आता त्यांच्या डेटिंगविषयी काही अप्रुप राहिलेले नाही. टायगरला आणि दिशाला जेंव्हा वेळ मिळेल, तेंव्हा ते एखाद्या आलिशान रेस्टॉरंटमध्ये डिनरला जात असतात. असेच मध्यंतरी ते एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. बाहेर पडताना त्यांना त्यांच्या फॅन्सनी गराडा घातला. यावेळी टायगर एखाद्या प्रोटेक्‍टिव्ह बॉयफ्रेंडप्रमाणे आपल्या गर्लफ्रेंडला गर्दीतून बाहेर काढताना दिसत होता. त्याने दिशाच्या पाठीमागे उभे राहून तिला रस्ता मिळवून द्यायला मदत केली.

टायगरच्या मदतीने दिशा या फॅन्सच्या गर्दीतून बाहेर पडू शकली. यापूर्वीही अशाच प्रकारे फॅन्सच्या गर्दीमध्ये दिशा अडकली होती. दिशाच्या 27 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र होते. तेंव्हाही फॅन्सच्या गर्दीमध्ये अडकलेल्या दिशाला टायगरनेच बाहेर काढले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळापासूनच हे दोघेही आपल्यातील रिलेशनशीपबाबत खूप ओपन आहेत. त्यांच्यातील रिलेशनशीप बघून टायगरचे डॅड जॅकी श्रॉफ यांनीही हे कदाचित लग्न करतील, असे भाकित वर्तवले आहे. मात्र या दोघांकडून मात्र तसे कोणतेही सूतोवाच केले गेलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.