#Prokabaddi2019 : यू पी योद्धापुढे पाटणाची कसोटी

यू पी योद्धा वि. पाटणा पायरेटस
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा.
वेळ – रात्री 8-30 वा.

पाटणा – हरयाणा स्टीलर्सविरुद्धच्या पराभवाची कसर भरून काढण्यासाठी पाटणा पायरेट्‌स संघाला आज यू पी योद्धाच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. पाटलीपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पाटणाचा संघ संभाव्य विजेता मानला जात असला तरी या मोसमात त्यांची कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही.

पाटणा पायरेटस

बलस्थाने – घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ, अनुभवी खेळाडूंची मांदियाळी.
कच्चे दुवे – विनाकारण दडपण घेण्याची वृत्ती, खेळावर नियंत्रणाचा अभाव.

या स्पर्धेत आतापर्यंत तीन वेळा त्यांनी अजिंक्‍यपद मिळविले आहे. त्या दर्जाचा खेळ त्यांनी दाखवावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. त्यांना आनंद देण्यासाठी त्यांना चढाया व पकडी या दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे.

यू पी योद्धा

बलस्थाने – जिगरबाज खेळ करण्यात वरचढ, नियोजनपूर्वक खेळाबाबत चांगली कामगिरी.
कच्चे दुवे – शेवटच्या मिनिटांमध्ये घिसडघाई, पकडींमध्ये अक्षम्य चुका.

घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ त्यांना मिळणार आहे. योद्धा संघाने तमिळ थलाईवाज संघाविरुद्ध कौतुकास्पद खेळ केला होता. मात्र, अक्षम्य चुकांमुळे त्यांना हा सामना बरोबरीत ठेवावा लागला होता. त्यांच्याकडून आज पाटणा संघाला चिवट झुंज मिळेल अशी आशा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)