पाटणा पायरेटस वि. हरयाणा स्टीलर्स
स्थळ – पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा
वेळ – रात्री 8-30 वा.
पाटणा – प्रो कबड्डी स्पर्धेत आज पहिल्या लढतीत तमिळ थलाईवाज संघासमोर यू पी योद्धा संघाचे आव्हान असणार आहे तर अन्य लढतीत घरच्या मैदानावर पाटणा पायरेटस संघाची हरयाणा स्टीलर्सविरुद्ध कसोटीच ठरणार आहे.
पाटलीपुत्र क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. पाटणा संघास आपल्या चाहत्यांसमोर अव्वल दर्जाची कामगिरी करता आलेली नाही. तीन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या या संघास पकडी व चढाया या दोन्ही आघाड्यांवर निराशा पाहावयास मिळाली आहे. पाच सामन्यांमध्ये दोनच सामने त्यांना जिंकता आलेले आहेत.
हरयाणा संघाकडून त्यांना चिवट लढत मिळेल अशी अपेक्षा आहे. तंदुरुस्तीमध्ये वरचढ असणाऱ्या या संघाने चार लढतींपैकी एकच लढत जिंकली आहे.
पाटणा पायरेटस –
बलस्थाने – घरच्या वातावरणाचा फायदा सांघिक समन्वयाबाबत माहीर
कच्चे दुवे – चढायांमध्ये अक्षम्य चुका महत्त्वाच्या क्षणी नियंत्रण नाही
हरयाणा स्टीलर्स –
बलस्थाने – ताकदवान खेळात वरचढ जिद्दीने लढण्याची वृत्ती
कच्चे दुवे – पकडी व चढायांमध्ये खूपच चुका नियोजनपूर्वक खेळाचा अभाव