शपथ घेण्यापूर्वी नितीश कुमार म्हणाले, ‘मला बिहारचा मुख्यमंत्री व्हायचे नव्हते पण…’

पटना – बिहारमध्ये उद्या (सोमवार) पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नतृत्वात नवीन सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वी नितीश कुमार यांनी मोठे विधान करून सर्वांना चकित केले आहे. आज पटनामध्ये विधानसभेचे नेते म्हणून निवडून आल्यानंतर नितीशकुमार म्हणाले, मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते परंतू भाजप नेत्यांच्या आग्रहामुळे मी मुख्यमंत्री होण्याचा स्विकार केला.

नितीश कुमार म्हणाले, यावेळी मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशी माझी इच्छा होती. पण भाजपच्या लोकांनी मला मुख्यमंत्री होण्याची विनंती केली.

आज पटनामध्ये बऱ्याच बैठका घेण्यात आल्या. एनडीएच्या बैठकीत विधानसभेचे नेते म्हणून सुशील मोदी यांचे नाव जाहीर करण्यात आले. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर त्यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ राज्यपाल यांच्या सभागृहात पोहोचले. तेथे सर्वांनी मिळून सरकार स्थापनेचा दावा केला. नितीशकुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला आणि राज्यपालांना 126 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले.

सातव्यांदा मुंख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा नितीशकुमार यांचा मार्ग मोकळा झाले आहे. सोमवारी नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे तर सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

या निवडणुकीत एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा उदयास आला आहे, तर जेडीयूला त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत, अशा परिस्थितीत नितीशकुमार मुख्यमंत्री होण्याबाबत आधी प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. मात्र आता त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.