पाटण मतदारसंघात 25 हजार नवीन मतदार

पाटण – पाटण विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी 10 हजार 934 नवीन मतदार नोंदणी झाली आहे. एकूण मतदारांची संख्या 2 लाख 97 हजार 781 इतकी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. 1 लाख 50 हजार पुरूष तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 47 हजार 475 असून एकूण मतदानकेंद्रे निर्धारित केली आहेत. त्यामध्ये एकमेव पाडळी-केसे या कराड तालुक्‍यातील गावातील सहाय्यकारी मतदान केंद्राचा समावेश आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात 1 सप्टेंबरला 2 लाख 86 हजार 847 मतदार होते. नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 10 हजार 934 मतदारांची नोंदणी झाली असून एकूण मतदारांची संख्या 2 लाख 97 हजार 781 झाली आहे. त्यामध्ये 1 लाख 50 हजार 306 पुरूष मतदार व 1 लाख 47 हजार 475 महिला मतदारांचा समावेश आहे. 18 ते 19 वयोगटातील 4 हजार 485 व 19 ते 29 वयोगटातील 5 हजार 920 अशी एकूण नवीन मतदार नोंदणी झाली आहे. दहा हजाराची नवीन व युवक मतदारांची वाढलेली संख्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारी आहे.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 1 लाख 38 हजार 353 पुरूष तर 1 लाख 33 हजार 772 महिला मतदार अशी एकूण 2 लक्ष 72 हजार 125 मतदार आहेत. नवीन मतदार नोंदणीचा विचार केला तर 2014 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीसाठी 25 हजार 653 मतदारांची संख्या वाढलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 397 मतदार केंद्रे आहेत. कराड तालुक्‍यातील केसे पाडळी या मतदान केंद्राची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.