“अशी “पाटीलकी’ चालू देणार नाही’

कधीही भरून न येणारे नुकसान

गेल्या 12 वर्षापासून पाटील हे पदवीधरांचे आमदार आहेत. मात्र ते पदवीधरांचे कमी आणि विधानसभा मतदारसंघातील आमदार असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी पदवीधरांसाठी हिताचा कुठलाच निर्णय घेतला नाही. पुणे पदवीधर मतदारसंघातील (पाच जिल्ह्यातील) 35 हजार पदवीधरांचे कधीही भरुन न येणारे नुकसान पाटील यांनी त्यांच्या सरकारने केले असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र स्टेट टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन फेडरेशन आता पदवीधरांमध्ये जागृती करणार असल्याचेही यावेळी ऍड. आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

पिंपरी  – पुणे पदवीधर मतदार संघातील सुमारे 35 हजार कर सल्लागार व्यावसायिकांचे स्वयंरोजगार क्षेत्र आघाडी सरकार बरोबरच युती सरकारकडून सुद्धा नष्ट करण्यात आले आहे. याबाबत पुणे पदवीधर मतदार संघातील आमदार चंद्रकात पाटील यांनी काही केले नाही. पदवीधरांसाठी विधानपरिषदेत आवाज न उठवणाऱ्या पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची पाटीलकी आता चालू देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन फेडरेशनचे अध्यक्ष ऍड. आप्पासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ऍड. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील आघाडी सरकारने व्हॅट कायद्यातील लेखापरीक्षक हक्क 2005 सालापासून नाकारला आहे. यामुळे लाखो व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. याविरोधात पाटील यांनी आघाडी सरकार विरोधात कुठलाही आवाज उठवला नाही तर, युतीची सत्ता आल्यावर सुद्धा काहीही प्रयत्न केले नाही. ते मोठ्या खात्याचे मंत्री झाले आहे. मात्र, त्यांनी आपल्या मतदारांसाठी ठोस कार्य केले नसून ते एक निष्क्रिय आमदार असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. इतर राज्यात करसंल्लागारांना लेखा परीक्षणांचा अधिकार दिला आहे. मात्र, महाराष्ट्रातच का दिला जात नाही ? यामुळे एक लाख पदवीधर कर सल्लागारांचे प्रपंच उद्धवस्त
झाल्याचा आरोपही त्यानी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)