रुग्णांचा “गंभीर’ गोंधळ

अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी; 300चा हिशेब लागता लागेना

पुणे – शहरातील करोनाच्या गंभीर रुग्णांच्या आकडेवारीचा गोंधळ अद्यापही कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिकेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शहरातील गंभीर रुग्णांचा आकडा 301 ने कमी करत, 927 वरून थेट 626 वर आणला आहे. त्यामुळे हे रुग्ण कमी झाले असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर आरोग्य विभागाकडेही त्याबाबत उत्तर नसल्याने अधिकाऱ्यांकडून एकमेकांवर टोलवाटोलवी केली जात आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील गंभीर रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. परिणामी, शहरात ऑक्‍सिजन बेडची कमतरता भासत आहे. मात्र, अशा स्थितीत शहरात ऑक्‍सिजनचे बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या नेमकी किती आणि प्रत्यक्षात गंभीर रुग्ण किती याचा ताळमेळ लावणे आवश्‍यक असताना, पालिकेकडून मात्र, आकडेवारीत गोंधळ घातला जात आहे.

महापालिकेकडून ही आकडेवारी दरारोज जाहीर केली जाते. पालिका प्रशासनाकडून बुधवारी (28 जुलै) शहरात शहरात 742 अत्यावस्थ रुग्ण दाखविण्यात आले. त्यात 98 व्हेंटिलेटरवर त 644 ऑक्‍सिजन दिला जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.29) मुख्यमंत्री करोना नियंत्रणाचा आढावा घेणार असल्याने पालिकेने आपल्या अहवालात अचानक ऑक्‍सिजन सुरू असलेल्या रुग्णांचा आकडा 2200 ने वाढविण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री परत जाताच, पालिकेकडून पुन्हा व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा आकडा शुक्रवारच्या अहवालात लगेच 301 रुग्णांनी कमी करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.