नवी दिल्ली – पेशंटला रुग्णालयात दाखल करून घेण्यास अथवा त्यांच्यावर उपचार करण्यास नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि केंद्र तसेच राज्य सरकारी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्स केली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, काही रुग्णालयांमध्ये पेशंटना दाखल करून न घेता परत पाठवले गेले असल्याच्या काही तक्रारी मिळाल्या आहेत.
केवळ कोविड पेशंटच नव्हे तर अन्य पेशंटचीही या काळात योग्य ती काळजी घेतली जावी, अशी सूचना त्यांनी केली. रुग्णांवर योग्य उपचार न करता त्यांना तेथून परत पाठवून देण्याचा प्रकार घडला तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.