“पती, पत्नी और वो’चे शुटींग सुरू

“सांड की आंख’ मध्ये म्हातारीचा रोल साकारणाऱ्या भूमि पेडणेकरने कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेच्या बरोबर मिळून आगामी “पती, पत्नी और वो’च्या शुटिंगला आजपासून सुरूवात केली आहे. या सिनेमाच्या पहिल्या शेड्युलसाठी ती शनिवारीच लखनौला पोहोचली आणि तिने सिनेमाच्या स्क्रीप्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर देखील केला आहे. त्याच पोस्टमध्ये या सिनेमाचे शुटिंग मंगळवारपासून सुरू होत असल्याचे भूमिने लिहीले आहे.

लखनौच्या एअरपोर्टवर कार्तिक आणि अनन्यासोबतच्या फोटोपासून सगळ्या गोष्टींचे अपडेट इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. ती लखनौला दुसऱ्यांदा आली आहे. यापूर्वी “बाला’च्या शुटिंगसठी ती येथे आली होती. “बाला’ मध्ये ती आयुष्मान खुराना आणि यामी गौतमबरोबर दिसणार आहे.

“पती, पत्नी और वो’ हा 1978 सालच्या याच शिर्षकाच्या सिनेमाचा रिमेक आहे. मूळ सिनेमामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रणजीता कौर हे मुख्य कलाकार होते. स्वतःची बायको कितीही सुंदर असली तरी अन्य स्त्रियांकडे आकर्षित होणाऱ्या पुरुषांच्या स्वभावाचा गमतीशीर अनुभव या सिनेमात बघायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.