मिरवणुकीने पाथर्डीत लाडक्‍या बाप्पाला निरोप

पाथर्डी - तालुक्यातील आगसखांड या गावातील विठ्ठलनगर येथील अोंकारेश्वर मंडळाच्या वतीने डीजे, गुलाल विरहीत गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये महिलांचे लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण होते.

पाथर्डी – तालुक्‍यासह शहरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पडली. “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’…. असा जय घोष करत लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरात दुपारी पाच वाजण्याचा सुमारास अजंठा चौकात विसर्जन मार्गावर पहिला मानाचा गणपती नवोदय तरुण मंडळ दाखल झाला.

यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे,नायब तहसीलदार पंकज नेवसे, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, ऍड दिनकराव पालवे, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक प्रसाद आव्हाड, मिठूभाई शेख आदींनी मंडळींचे स्वागत करून श्रींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केले. ढोल, ताशे, बॅण्ड या पारंपारिक वाद्याच्या तालावर विसर्जन मिरवणुकीत सर्वच गणेश भक्तांनी नृत्य करत गुलालाची उधळण करून मोठ्या भक्तिभावाने आपल्या गणेशाला निरोप दिला. नवोदय, जय भवानी, गणेशपेठ, विश्वकर्मा, कसबा व्यायाम शाळा, न्यू कसबा, अष्टविनायक आदी गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास शेवटचा गणपती मोहरीरोड अमराई मंदिराजवळील विहिरीत विसर्जित करण्यात आला. पालिकेकडून गणपती विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन प्रमुख अय्युब सय्यद, किशोर पारखे, दत्तू साळवे, दत्तात्रय ढवळे, सोमनाथ गर्जे विसर्जन ठिकाणी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे यांच्यासह पुरुष, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शनिवारी सायंकाळी जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. जय मल्हार मालिकेतील म्हाळसा फेम मराठी अभिनेत्री सुरभी हांडे यांची उपस्थिती मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले. यावेळी अभिनेत्री हांडे यांनी भाविकांशी साधलेला संवाद शहरवासीयांसाठी मोठी पर्वणी ठरला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. प्रतीक खेडकर यांनी विसर्जन मिरवणुकीचे केलेले सुरेख नियोजन शहरात चर्चेचा विषय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)