शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सध्या “पठाण’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. आता या सिनेमाशी संबंधित एक गोष्ट पुढे आली आहे. या सिनेमातील एका खास गाण्याचे शूटिंग स्पेनमध्ये होणार आहे. त्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. यासाठी स्पेनमधील अगदी विशेष लोकेशन शोधून काढण्यात आले आहे.
या ठिकाणी बॉलीवूडमधील कोणत्याच सिनेमाचे शूटिंग आतापर्यंत झालेले नाही. नक्की कोणत्या ठिकाणी हे शूटिंग होणार आहे याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. बघताक्षणी हिट व्हावे,
असे भव्यदिव्य गाणे शूट करावे, असा निर्माते आणि दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. प्रोड्युसर आदित्य चोप्रा आणि डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांनी मिळून हे लोकेशन फायनल केले आहे.
हे दोघेजण एकत्र आले की प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवतात, हे “द वॉर’च्या निमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे. या दोघांना भारतीय सिनेमा जगाच्या नकाशावर नव्याने सादर करायचा आहे.
यासाठी जे शक्य आहे असे सर्वकाही करण्याची तयारी या दोघांनी ठेवली आहे. या निमित्ताने शाहरुखच्या बंद पडलेल्या गाडीला पुन्हा एकदा जोरात धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.