हरीद्वार : रूची सोयावर ताबा मिळवणाऱ्या पतंजली उद्योग समुहाने येत्या वर्षात 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले.
या 25 हजार पैकी 12 हजार कोटीची उलाढाल पतंजलीची असेल तर 13 हजार कोटीची उलाढाल रुची सोयाची असेल असे त्यांनी सांगितले.
येत्या पाच वर्षात आमची उलाडाल 50 हजार ते एक लाख कोटीच्या दरम्यान असेल. आणि आमची सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी असेल.
रूची सोया ही कंपनीने पतंजलीने चार हजार 500 कोटी रुपयांना विकत घेतली. त्यामूळे आमच्या उत्पादनांच्या श्रेणीत वाढ होणार असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.