पुणे – महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन केले आहे. दरम्यान, शहराच्या प्राचिनतेची साक्ष देणारे शहराच्या मध्यवर्ती भागातील पाताळेश्वर मंदिरात आज (दि. २१) महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.