इंदुर – वैयक्तिक कारणाने मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ कर्णधार पॅट कमिन्स याने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. आता त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करणार आहे. चौथ्या कसोटीत तरी कमिन्स संघात परतणार का, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला दोन सामने गमवावे लागले आहेत. आता तिसरा कसोटी सामना येत्या 1 मार्चपासून येथे सुरू होत असून त्यापूर्वीच नियमित कर्णधार कमिन्स याची आई गंभीर आजारी असल्याने मायदेशी परतला.
पाठोपाठ त्यांच्या संघातील चार खेळाडूंनी दुखापतीमुळे या कसोटीतूनही माघार गेतली असल्याने आता अंतिम संघ कसा निवडायचा हेच त्यांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे. अशा स्थितीत कमिन्स भारतात परतेल अशी अपेक्षा केली जात होती, मात्र आता ती फोल ठरली आहे. या मालिकेसाठी माजी कर्णधार असलेल्या स्मिथला उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, आता तोच नेतृत्व करेल.
Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण प्रकरणात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीला मुदतवाढ
सॅंडपेपर घटनेनंतर पुन्हा स्मिथकडे नेतृत्व
स्मिथने 2014 ते 2018 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे 34 कसोटीत नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याच्यावर सॅंडपेपर घटनेनंतर कारवाई करण्यात आली व त्याचे नेतृत्व काढून घेण्यात आले होते. आता कमिन्सच्या माघारीमुळे संघातील अनुभवी खेळाडू म्हणूनच त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे.