इंडिगोच्या कारभारावर प्रवाशांनी व्यक्त केला संताप

सामान दिल्लीत आणि प्रवासी पोहोचले इस्तांबुलला
नवी दिल्ली: 15 सप्टेंबर रोजी इंडिगो एअर लाईन्सच्या विमानाने इस्तांबुलला जाणाऱ्या विमानातील प्रवासांना प्रचंद मनस्तापाचा सामना करावा लागला असून इंडिगोच्या कारभारावर प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कारण प्रवाशी जरी इस्तांबुलला पोहोचले असले तरी प्रवाशांचे सामान हे दिल्ली विमानतळावरच राहिले होते. त्यामुळे प्रवाशांनी ट्‌विटरच्या माध्यमातून आपल्या तक्रारी “शेम ऑन इंडिगो” हॅशटॅग वापरत मांडल्या.

इंडिगोचे विमान 6ए हे दिल्लीतून इस्तांबुल येथे पोहोचले. त्यानंतर जेव्हा आम्ही सामानाच्या बेल्टकडे थांबलो तेव्हा आपला त्यावर एक पेपर मिळाला. इंडिगो प्रवाशांचे सामान विमानात भरणे विसरले होते. एकाही प्रवाशाला त्याचे सामान मिळाले नाही. इंडिगो असे कसे करू शकते. माझ्या आई वडिलांची औषधे लगेज बॅगमध्ये होते. ते डायबिटिसचे रूग्ण आहेत. या विमानात असेही अनेक प्रवासी आहेत ज्यांची कनेक्‍टिंग फ्लाईट देखील आहे. आपल्या सामाना शिवाय ते पुढे कसे जातील, असं ट्‌विट या विमानातून प्रवास करणाऱ्या चिन्मय दाबके यांनी केले. तर इंडिगोकडून असा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. 8 सप्टेंबर रोजीही इंडिगो प्रवाशांचे सामान विमानात लोड करणे विसरले होते. असे ट्‌विट मनाली अग्रवाल यांनी केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×