पुणे – दिवाळीनिमित्त मराठवाड्यातील प्रवाशांसाठी गावी जाण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे-नांदेड विशेष रेल्वे सुरू केली. ही रेल्वे (दि.25) दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून नांदेडसाठी रवाना झाली. यावेळी मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांनी या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
ही विशेष रेल्वे शनिवारी (दि.26) सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी नांदेडला पोहोचणार आहे. तर, त्याच दिवशी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने रवाना होणार असून रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. पुणे ते नांदेडदरम्यान दौंड, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर रस्ता, परळी वैजनाथ, परभणी या स्थानकांवर रेल्वे थांबणार आहे. ही रेल्वे सर्व सोई-सुविधायुक्त असल्याने प्रवाशांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.