रेल्वेकडून पुणे-पंढरपूर मार्गावर पॅसेंजर 

पुणे – श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुण्याहून पंढरपूरला पॅसेंजर सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. दि.7 ते 16 जुलै या कालावधीत ही गाडी दररोज पुणे-पंढरपूर मार्गावर धावणार आहे.

दररोज सकाळी सव्वासहा वाजता ही पॅसेंजर (गाडी क्र-01487) पुणे स्थानकातून रवाना होईल. ती हडपसर, मांजरी बुद्रुक लोणी, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भीगवण, पारेवाडी, जेऊर, कुर्डुवाडी मोडलिंब हे थांबे घेत दुपारी एक वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर, पंढरपूरहून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता पॅसेंजर (गाडी क्र-01488) परतीच्या प्रवास सुरू करेल. ती रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात दाखल होणार आहे. या गाडीला एकूण 14 डबे असतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.