काठमांडू – नेपाळमधील प्रसिद्ध हिंदू पशुपतिनाथ मंदिर पुन्हा खुले करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सरकारकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरातील पूजाअर्चेवर निर्बंध घालण्यात आले होते.
पशुपती क्षेत्र विकास ट्रस्ट (पीएडीटी) यांच्या सभेला संबोधित करताना पर्यटन आणि नागरी उड्डाणमंत्री योगेश भट्टराय यांनी ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना जागतिक वारसा स्थळ असलेले पशुपतिनाथ मंदिराचा विकास करण्यासंबंधीही माहिती दिली. भट्टराय यांनी म्हटले की, कोणत्याही योजनेवर कार्य करण्याअगोदर धार्मिक स्थळांच्या हिताचा विचार केला पाहिजे. करोना विषाणूसंबंधी योग्य खबरदारी घेऊन दिवसा विशिष्ट कालावधीत मंदिर खुले करण्यासंबंधी त्यांनी ट्रस्टसोबत चर्चा केली.