बॉलिवूडमध्ये आजकाल स्टार किडस्चे युग असल्याचे पाहायला मिळत आहे. यात कोणी बॉलिवूडमध्ये दमदार डेब्यू केले आहे, तर कोणी त्याची तयारी करण्यात व्यस्त आहे. यात आता आणखी एक जण डेब्यू करण्यास सज्ज झाले आहे. हे दुसरे-तिसरे कोणी नसून अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्चिना आहे. हृतिक रोशनने आपल्या बहिणीची ओळख करून देणारी एक पोस्ट शेअर करत पश्चिनाचा गर्व आहे, असेही म्हटले आहे. पश्चिना ही म्युझीक कंपोझर राजेश रोशन यांची मुलगी आहे.
हृतिक रोशनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पश्चिनासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. हृतिकने या पोस्टमध्ये पश्चिनाचे अनेक ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. ही छायाचित्रे पाहून ती या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यास अगदी तयार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पश्चिनाची स्टाईल पाहून हृतिक रोशनच्या या पोस्टलाही अनेकांनी लाईकस् दिल्या आहेत.
यासह फोटो शेअर करताना हृतिकने एक कॅप्शन लिहीत सांगितले की, पश्मिना मला तुझ्यावर गर्व आहे. तू खूपच खास असून प्रतिभासंपन्नही आहेस. तू जिथे-जिथे जाते तेथील वातावरण प्रसन्न होते. कधीकधी मला आश्चर्य वाटतं की तुला ही जादू कोठून मिळाली, पण मी नेहमीच देवाचे आभार मानतो, कारण तू आमच्या कुटुंबातील आहेस. भविष्यात तुला भेटणारे प्रत्येक जणही स्वतःला खूप भाग्यवान समजेल.’