पिंपरीत 68 मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग

पिंपरी  – पिंपरी परिसरातील 68 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत, वाजत-गाजत आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप दिला. सुमारे बारा तास चाललेल्या या मिरवणुकीने पिंपरीत उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांनी आपल्या विसर्जन रथाची वेगवेगळी सजावट केली होती.

यावर्षीच्या मिरवणुकीमध्ये फुलांची आरास आणि जिवंत देखावे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले होते. एलप्रो वर्कर्स या मंडळाने सव्वाबारा वाजता विसर्जन मिरवणुकांची सुरुवात केली. परंतु खऱ्या अर्थाने मिरवणुकीला सुरुवात सायंकाळीच झाली. राष्ट्रतेज मित्र मंडळ या मंडळाने रात्री 12 वाजता विसर्जन मिरवणुकीचा शेवट झाला. पिंपरी शहरात शिवराजे प्रतिष्ठान (फळबाजार) आणि लाल बहादूरशास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटना ही दोन मंडळे महत्वाची मानली जातात. पिंपरी मधील विसर्जन मिरवणुकीत सर्वांचे या दोन मंडळांच्या मिरावणुकीकडे लक्ष लागलेले असते. शिवराजे प्रतिष्ठानने “साई दरबार’ हा जिवंत देखावा सादर केला. या मंडळाने साडेआठ वाजता विसर्जन केले. तर भाजी मंडई मंडळाने बाप्पा बैलगाडीतून निघाल्याचा देखावा सादर केला. या मंडळाने पावणेदहा वाजता श्रीगणेशाचे विसर्जन केले.

याशिवाय एलप्रो वर्कर्स, ब्ल्यू स्टार मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, शिवशंकर मित्र मंडळ, दुर्गादेवी तरुण मंडळ, झुलेलाल मित्र मंडळ, माईंड स्पेस हॉटेल पिंपरी, जय भारत तरुण मंडळ, पवन मित्र मंडळ, फाईव्ह स्टार तरुण मंडळ, बाल मित्र मंडळ, सदानंद तरुण मित्र मंडळ, एस पी फायनान्स, कलश मित्र मंडळ, जय भारत तरुण मंडळ, कोहिनुर मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ पिंपरी, श्री गणेश मित्र मंडळ नेहरूनगर, श्री जयसिंग मित्र मंडळ, श्री प्रेमप्रकाश मित्र मंडळ, पुणे हॉकर्स पंचायत भाजी मंडई, गुप्ता मित्र मंडळ, संग्राम मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, गणराज तरुण मंडळ, सनशाईन मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, न्यु जैत्य मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, द्वारका मित्र मंडळ, ईगल मित्र मंडळ, न्यु नवजवान मित्र मंडळ, शिवशक्ती तरुण मित्र मंडळ, शिवराज प्रतिष्ठान, सुपर्ब युथ सर्कल, बाल मित्र मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, श्री बालाजी गणेश मित्र मंडळ, श्रीमहादेव मित्र मंडळ, शिवनेरी सोसायटी मित्र मंडळ, न्यु भारत मित्र मंडळ, सावित्रीबाई फुले मित्र मंडळ, लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई, गौतम मित्र मंडळ, लाल बहादूर शास्त्री मित्र मंडळ, अमरज्योत तरुण मित्र मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, श्री साई प्रतिष्ठान, फ्रेंड सर्कल, श्री ओम साई राम मित्र मंडळ, ज्ञानेश्‍वर मंडळ, मातोश्री पुष्प भांडार, मयुरेश्‍वर पुष्प भांडार, वैशाली मित्र मंडळ, भोळेश्‍वर सेवा तरुण मंडळ, श्री नवचैतन्य तरुण मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, सुदर्शन मोटर्स तरुण मित्र मंडळ, शिवबा प्रतिष्ठान, साई मित्र मंडळ, श्री साई मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, राष्ट्रतेज मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या. ढोल-ताशा पथक, बॅंड पथक, डीजेच्या तालावर गणेश भक्तांनी नाचून गाऊन बाप्पाला निरोप दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×