पोलीस ठाणे ते आकाशवाणी रस्त्याचे अर्धवट काम

अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त
अनेकजण पडले खड्ड्यात
नगर (प्रतिनिधी) – तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून या कामास काही ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. मात्र तोफखाना पोलीस ठाणे ते आकाशवाणी दरम्यान रस्त्यारुंद करण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम केले आहे. मात्र हे काम बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकजण खड्ड्यात पडल्यामुळे किरकोळ जखमी झाले आहे. पालिकेने रस्त्याचे काम लवकारात लवकर मार्गिलावावे अशी मागणी पादचाऱ्यांकडून होत आहे.

महापालिकेने तीन कोटी 48 लाख रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग महालापर्यंत रस्त्याचे काम केले जाणार आहे. ठेकेदाराला दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश दिलेला आहे; तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे ही काढण्यात आली आहेत. काही ठिकाणी कामे सुरु झाली आहेत तर काही ठिकाणी अर्धवट रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

तोफखाना पोलीस ठाणे ते गुलमोहर कॉर्नर, 20 मीटर, गुलमोहर कॉर्नर ते भिस्तबाग 18 मीटर तर भिस्तबाग ते महाल 15 मीटर रस्ता रुद करण्यात येणार आहे. त्यामुळे सावेडी उपनगरातील सर्वांत महत्त्वाचा रस्ता वाहतूकीसाठी होणार आहे. मात्र सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. दुभाजक तुटले असून, गोकुळनगर परिसरात तर हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आले. याबाबत शहर अभियंता यांच्याशि संपर्क साधला असता ते म्हनाले की, रस्त्याखाली येणाऱ्या पाईप लाईन काढाल्या जाणार असून याबाबत पाणी पुरवठा विभागाला आदेश दिले आहेत. शहरातील मॅडेल म्हणून रस्ता करण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.