पिंपरी चिंचवड : येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
काय म्हणाले पार्थ पवार?
“भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना आमदार करून दाखवणार”, असं वक्तव्य पार्थ पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भाजप आमदाराने दिला इशारा
पार्थ पवारांनी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नाना काटेंना आमदार करण्याचा चंग बांधलाय. भाजपच्या वाट्याला असणाऱ्या जागेवर पार्थ पवारांनी दावा केला. त्यामुळं पार्थ पवारांनी महायुतीत खडा पडेल, अशी वक्तव्य टाळावीत, असा इशारा भाजपचे आमदार अमित गोरखेंकडून देण्यात आला आहे.