टीएमसीच्या खासदार मिमी चक्रवर्ती आईसमवेत संसदेत

नवी दिल्ली: खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. त्यांनी शेअर केलेले फोटो लगेच व्हायरल होतात. यावेळी त्यांनी आपली आई तापसी चक्रवर्तीसोबत एक फोटो पोस्ट केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ती आईसह आली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. आईसमवेत फोटो पोस्ट करताना 30 वर्षीय मिमीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आईबरोबर संसदेचे पहिले अधिवेशन …”

मिमी यांनी पश्चिम बंगालमधील जाधवपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि ती विजयी झाली. मिमीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मीमीशिवाय तिची खास मैत्रीण नुसरतही खासदार आहे. नुसरत आणि मिमी संसदेत एकत्र दिसतात. काही महिन्यांपूर्वी नुसरतचे लग्न झाले आहे.

मिमी चक्रवर्ती हे बंगाली चित्रपट आणि दूरदर्शनमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सिनेमात येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगही केली आहे. मिमी चक्रवर्तीचा पहिला चित्रपट 2012 मध्ये रिलीज झालेला ‘बप्पी बारी जा’ होता. त्यांनी बर्‍याच शोमध्येही आपली उपस्थिती लावली आहे. मिमी चक्रवर्ती यांचा जन्म जलपाईगुडी येथे झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here