संसदेचे अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबर पासून सुरू होईल आणि 23 डिसेंबरला ते स्थगित होईल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्र्यांनी सोमवारी दोन्ही सभागृहाच्या सचिवालयांना कळवली.

संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या शासकीय निवासस्थानी संसदीय कामकाज मंत्रीमंडळ समितीची बैठक झाली. त्यात अधिवेशनाच्या संभाव्य वेळापत्रकाविषयी चर्चा झाली. हे अधिवेशन जम्मू काश्‍मिरमधील स्थिती आणि आर्थिक मंदीच्या मुद्यावरून वादळी ठरण्याची शक्‍यता आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नव्या आणि देशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्‍समधील कपातीबाबत काढलेल्या अधिसुचनेला कायद्यात परावर्तीत करण्यासाठी प्रप्तीकर कायदा 1961मध्ये आणि वित्तपुरवठा कायदा 2019 मध्ये सुधारणा विधेयक सरकारसाठी महत्वाचे असेल. तसेच इ सिगारेट बंदीलाही कायद्याच्या कक्षेत बसवावे लागेल.

मोदी सरकार पुन्हा सत्तेवरआल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.