नवी दिल्ली : देशात महिलांवर होणारे लैंगिक शोषणाचे वाढत्या गुन्ह्यांवरून लोकसभेत सोमवारी जोरदात युक्तीवाद घडले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या लैंगिक छळाबाबतचे मुद्दे हाताळणारा नवा कायदा आणण्याचे संकेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिले.
जर सभागृहाला गरज वाटत असेल तर महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांसाठी नवीन कायदा आणण्यात येईल. तृणमूल कॉंग्रेसचे सौगत रॉय यांनी स्थानिक प्रशासन आणि तेलंगणाच्या गृहमंत्र्यावर टीकेची झोड उठवली. त्या मुलीचे कुटुंबीय तिचा शोध घेण्यासाठी धावत पळत पोलिस ठाण्यात गेले. मात्र स्थानिक प्रशासन ढिम्म राहिले. तरीही तेलंगणाचे गृहमंत्री असंवेदनशीाल विधाने करतात. बलत्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यासाठी फाशीच द्यायला हवी अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली. तर या घटनेची गंभीर दखल घ्यायला हवी अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली.
लोकसभेत शुन्य प्रहरात कॉंग्रेसच्या उत्तम कुमार नलमड रेड्डी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. हैदराबाद शहरात सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या भागात हा प्रकार घडला आहे. पिडितेने कुटुंबियांऐवजी पोलिसांना फोन करायला हवा होता, असे धक्कादायक विधान गृहमंत्री करतात. तर पोलिस तुमची मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेली असेल, असे म्हणत तिच्या कुटुंबियांचा अपमान करतात, या घटनांचा खरपूस समाचार घेतला.
राज्यात दारूची सुरू असणाऱ्या अनिर्बंध विक्रीमुळे अशा गुन्ह्यात वाढ होत आहे. या घटनेचा निषेध करत त्यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. तर दमुकचे नेते पी. विल्सन यांनी वेगळाच मुद्दा मांडला, अशा बलात्कारी व्यक्तीचे लिंग शस्त्रक्रिया करून अथवा रासायनिक प्रयोग करून काढून टाकण्याची परवानगी न्यायालयाने द्यायला हवी. या प्रक्रियेची किंतही आरोपींची मालमत्ता विकून वसूल करायला हवा. बलात्कारी व्यक्तीची ओळख सार्वजनिक केली पाहीजे.