पेगॅससच्या चौकशीसाठी विरोधक आक्रमक; लोकसभा पुन्हा दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली – पेगॅसस प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी विरोधकांनी आजही सभागृहात आक्रमक भूमिका घेतल्याने आजही लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले आहे. दोन विधेयकांचे प्रस्ताव सभागृहांच्या पटलावर ठेवण्याखेरीज आज काहीही कामकाज झाले नाही.

अधिवेशन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत विरोधक पेगॅसस हेरगिरी प्रकरणाचा विषय सभागृहात लाऊन धरीत आहेत. पण सरकारने त्या मागणीला अजून धूप घातलेली नाहीं. आजही सभागृहात विरोधी पक्षांचे सदस्य हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत होते. या गोंधळामुळे सुरुवातल दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकुब करावे लागले आहे. आता हे कामकाज 2 ऑगस्टला सुरू होईल.

आज सभागृहात दिल्ली हवा शुद्धिकरण व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक आणि जनरल इन्श्‍युरन्स बिझनेस दुरुस्ती विधेयक अशी दोन विधेयके सादर झाली. त्या खेरीज आज लोकसभेचे कोणतेही काम होऊ शकलेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.