पुणे – शहरातील उद्याने, बागा दि. 31 ऑक्टोबरपर्यंत तरी बंदच राहतील, अशी महिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय घेतला जाणार असून पुणे शहरातील उद्याने एवढ्यात अनलॉक होण्याची शक्यता कमीच आहे, असे सूतोवाच मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी केले.
घोरपडे म्हणाले की, उद्यानांबाबत अजून धोरण निश्चिती केली गेलेली नाहीत. उद्यानात येणाऱ्यांमध्ये 80 टक्क्यांच्या वर ज्येष्ठ नागरिक व लहान मुलेच असतात. परंतु, वय वर्ष 10च्या आतील व 65 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नयेत, असे स्पष्ट आदेश आहेत.
उद्याने सुरू केली तर तेथे सर्वाधिक गर्दी होईल. परिणामी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून करोनाचा फैलावाचा धोका आहे.