Paris Olympics 2024 (Shooting) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 9वा दिवस आहे आणि नेमबाजीत भारताची निराशा झाली आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये रविवारी पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल आणि महिलांच्या स्कीट स्पर्धेत भाग घेणारे भारतीय नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील नेमबाजीचा समारोप सोमवारी स्कीट मिश्रित सांघिक स्पर्धांसह होईल. भारतीय नेमबाज अनंतजितसिंग नारुका आणि महेश्वरी चौहान सोमवारी या स्पर्धेत उतरणार आहेत.
25m Rapid Fire Pistol : अनिश आणि विजयवीरही अपयशी…
पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत अनिश आणि विजयवीर (Vijayveer Sidhu & Anish Bhanwala) हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचू शकलेले नाहीत. विजयवीर सिद्धूने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पात्रता फेरीत नववे स्थान पटकावले आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला.
🇮🇳 Result Update: Men’s #Shooting🔫 25m Rapid Fire Pistol Qualification👇
Vijayveer Sidhu and Anish Bhanwala make an exit from #ParisOlympics2024.
Vijayveer finished 9th with a score of 583, Anish had a 13th place finish with a total of 582 points.
Top 6 made it to the final… pic.twitter.com/SJN04VQmyg
— SAI Media (@Media_SAI) August 4, 2024
या प्रकारात अव्वल सहा नेमबाज हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. 22 वर्षीय भारतीय नेमबाजाने एकूण 583 गुण मिळवले. तर याच प्रकारात अनिश भानवाला 582 च्या अंतिम गुणांसह 13 व्या स्थानावर राहिला. त्यामुळे तोही अंतिम फेरीसाठी अपात्र ठरला.
Skeet Women’s Qualification : महेश्वरी आणि रयझा स्कीट स्पर्धेत अपयशी…
भारतीय नेमबाज महेश्वरी चौहान आणि रयझा धिल्लन (Maheshwari Chauhan & Raiza Dhillon) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या स्कीट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करू शकल्या नाहीत, या स्पर्धेत महेश्वरी एकूण 118 गुणांसह 14 व्या आणि रयझा 113 गुणांसह 23 व्या स्थानावर राहिल्याने पात्रता स्पर्धेतच त्यांची मोहीम संपली.
या स्पर्धेत 29 नेमबाजांनी भाग घेतला, त्यापैकी अव्वल सहा स्पर्धाक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. इटलीची 2016 रिओ ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती डायना बेकोसीही अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही. ती 117 गुणांसह 15 व्या स्थानावर राहिली.