Paris Olympics 2024 (Shooting, Mixed Team Skeet Bronze Medal Match) : भारताच्या अनंतजितसिंग नारुका आणि महेश्वरी चौहान (Anantjeet Singh Naruka and Maheshwari Chauhan) याची जोडी स्कीट मिश्र स्पर्धेच्या कांस्य पदकासाठी पात्र ठरली होती. मात्र कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीमध्ये अनंतजितसिंग आणि महेश्वरी यांच्या जोडीला चीनच्या जियांग यिटिंग व ल्यू जियांलीन या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला.
🇮🇳 Result Update: Skeet Mixed Team Bronze🥉Medal Match👇🏻
Anantjeet Singh Naruka and Maheshwari Chauhan endure heartbreak against China🇨🇳 at #ParisOlympics2024💔
They missed out on a podium finish by 1 point.
Earlier, the duo became the first Indian🇮🇳 pair to play for a… pic.twitter.com/6a9zIYyWQ6
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2024
अत्यंत अटीतटीच्या या लढतीत चीनने 44-43 अशा केवळ एका गुणांच्या फरकाने विजय साकारला. सुवर्णपदकासाठी इटली आणि अमेरिका यांच्यात सामना झाली. हा सामना देखील अतितटीचा राहिला. या सामन्यात इटलीने 45-44 ने अमेरिकेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे अमेरिकेला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
तत्पूर्वी, अनंतजितसिंग नारुका आणि महेश्वरी चौहान ही भारतीय जोडी स्कीट मिश्रित स्पर्धेच्या कांस्यपदक सामन्यासाठी पात्र ठरली होती. पात्रता फेरीत भारत आणि चीनच्या जोडीने समान 146 गुण मिळवले होते आणि संयुक्त तिसरे स्थान मिळवून कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली होती.