All Indian Atheltes List Qualified for Paris Olympics 2024 : पॅरिस 2024 मध्ये 33 व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणार आहे. येथे जगातील 10 हजारांहून अधिक खेळाडू पदक जिंकण्याचा दावा करतील. नीरज चोप्रा ते मीराबाई चानू आणि निखत जरीन या जागतिक दर्जाच्या बॉक्सरकडून भारताला पदकाची आशा असेल. यावेळी भारतीय संघात 113 खेळाडूंचा समावेश आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे 26 जुलैपासून सुरू होणार असून हे खेळ 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. गेल्या वेळी भारताने एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदके जिंकली होती. चला तर मग जाणून घेऊया की, यावेळी कोणते खेळाडू कोणत्या खेळात पदकांवर दावा ठोकतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची यादी जाणून घेऊया…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारतीय खेळाडूंची संपूर्ण यादी…
1. ॲथलेटिक्स –
पुरुष : अविनाश साबळे (3,000 मीटर स्टीपलचेस), नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना (भालाफेक), तजिंदरपाल सिंग तूर (शॉट पुट), प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी), अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त (20 किमी चालणे), मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (4×400 मीटर रिले), मिजो चाको कुरियन (4×400 मीटर रिले), सूरज पनवार (मिश्र मॅरेथॉन चालणे), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी), जेसविन एल्ड्रिन (लांब उडी)
महिला : किरण पहल (400 मी. धावणे), पारुल चौधरी (3,000 मीटर स्टीपलचेस आणि 5,000 मीटर), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा शर्यत), अन्नू राणी (भालाफेक), आभा खटुआ (शॉट पुट), ज्योतिका श्री दांडी, सुभा व्यंकटेशन, विठिया रामराज, पूवम्मा एमआर (4x400m रिले), प्राची (4x400m रिले), प्रियंका गोस्वामी (20 किमी चालणे). अंकिता ध्यानी ( 5000 मी धावणे).
2. शूटिंग – मनू भाकेर, ईशा सिंग, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप तोमर, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग, अनंतजीत सिंग, रयझा धिल्लन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंग, अर्जुन बाबौता, एलेनविल वालारिवन, रमिता जिंदल, स्वप्नील कुसले, सिफ्टी कुसले, आर. सांगवान, सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा
3. तिरंदाजी – दीपिका कुमारी, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव, तरुणदीप राय, भजन कौर, अंकिता भगत.
4. बॅडमिंटन – पीव्ही सिंधू, चिराग शेट्टी, सात्विक साईराज रेड्डी, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रास्टो
5. बॉक्सिंग – अमित पांगल, निखत जरीन, लोव्हलिना बोरगोहेन, जस्मिन लांबोडिया, प्रीती पवार, निशांत देव
6. इक्वेस्ट्रियन (घोडेस्वारी) – अनुष अग्रवाल
7. गोल्फ – शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दीक्षा डागर
8. सेलिंग – विष्णू सरवणन, नेत्रा कुमनन
9. टेबल टेनिस – शरथ कमल, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, हरमीत देसाई, मानव ठक्कर, अर्चना कामत
10. टेनिस – सुमित नागल, रोहन बोपण्णा, श्रीराम बालाजी
11. कुस्ती – विनेश फोगट, अंशू मलिक, अमन सेहरावत, निशा दहिया, रितिका हुडा, आनंद पांगल
12. वेटलिफ्टिंग – मीराबाई चानू
13. पोहणे – धिनिधी देसिंगू, श्रीहरी नटराज
14. रोव्हिंग – बलराज रोव्हिंग
15. ज्युडो – तुलिका मान
16 हॉकी – पीआर श्रीजेश, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, संजय, राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुजरंत सिंग. सिंह