Paris Olympics 2024 (Boxing,Lovlina Borgohain vs Li Qian) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 9वा दिवस आहे आणि बॉक्सिंगमधून भारतासाठी एक निराशाजनक बातमी आहे. भारताची महिला बॉक्सिंगपटू लोव्हलिना बार्गोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. चीनच्या अव्वल मानांकित ‘ली कियान’ हीने लोव्हलिनाचा 4-1 असा पराभव केला. बार्गोहेनने हा सामना जिंकला असता तर तिचे पदक निश्चित झाले असते, पण तिला अपयश आले.
🥊 Lovlina Borgohain loses against Li Qian of China by 1-4 in the Quarter Finals.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Boxing @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @Media_SAI @AkashvaniAIR @DDNational @DDIndialive @DDNewslive @BFI_official pic.twitter.com/bgDjod7cQP
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 4, 2024
दरम्यान, लोव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते तर कियान हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 75 किलो गटात रौप्य पदक तर त्याआधी रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
बॉक्सिंगमधील भारताचे आव्हान संपुष्टात…
भारताचे अमित पांगल, निखत झरीन, प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया हे 16 च्या फेरीतून बाहेर पडले. पण पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले निशांत देव आणि लोव्हलिना बोरगोहेन हे एकमेव भारतीय बॉक्सर होते. लोव्हलिनाच्या काही वेळापूर्वी, निशांत देवलाही पुरुषांच्या 71 किलो वजनी स्पर्धेत मेक्सिकोच्या मार्को अलोन्सो वर्देविरुद्ध 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यासह बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकाच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने बॉक्सिंगमध्ये पदक जिंकले होते, परंतु यावेळी भारतीय बॉक्सिंग कॅम्पला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागणार आहे.