आपल्या नृत्यअदाकारीने तरुण पिढीला घायाळ करणारी नोरा फतेही आपल्या “भुज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. या चित्रपटात ती अजय देवगणसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. वास्तविक, नोराची वर्णी परिणीतीच्या नकारामुळे लागलेली आहे.
म्हणजेच परिणतीच्या जागी तिला रिप्लेस केलं आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. अभिषेक दुधैया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सुरुवातीला परिणती चोप्रा एका प्रमुख भूमिकेत झळकणार होती. पण अचानकपणाने तिला या प्रोजेक्टमधून बॅकआऊट व्हावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या नायिकेच्या शोधात असतानाच नोरा फतेहीचा चेहरा समोर आला आणि तिच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले.
नोरा या चित्रपटात एका स्पायची भूमिका करणार आहे. नोरानेआयटम सॉंगच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. स्ट्रीट डान्सर या थ्रीडी चित्रपटातून ती पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. अशा स्थितीत ती “भुज’मध्ये अजयसोबत किती ताकदीने अभिनय करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.